गणपती बाप्पाच्या कृपेने पुण्यातील धरणं भरली : पुणे शहर व जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्याऱ्या धरणसाठ्यात पाण्याचा मुबलक साठा

पुणे दिनांक ३० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गणपती बाप्पाच्या कृपाने मागील दहा दिवसांत पुणे शहर व घाट माथ्यावर मुसाळधार पाऊस झाला व शुक्रवारी देखील मुसळधार पाऊस झाल्याने एका दिवसात १२ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे आता पुणे शहराला व जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात आता मुबलक असा पाणी साठा झाला आहे.त्यामुळे पुणे शहरा बरोबर जिल्ह्यातील पण नागरिकांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.या दमदार पाऊसामुळे पानशेत. वरसगाव.धरणं फुल्ल झाली आहे.तर खडकवासला धरण हे जवळ जवळ भरण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान खडकवासला धरणाच्या भागात चांगला पाऊस झाला आहे.त्यामुळे खडकवासला धरण आता जवळपास ९६% टक्के भरले आहे.या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.या धरण क्षेत्रात व साखळी क्षेत्रात झालेल्या पाऊसामुळे धरणात पाण्याचा मुबलक असा साठा झाला आहे.त्यामुळे पुणे शहरा बरोबरच जिल्ह्यातील नागरिकांचा जवळपास एक वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे.मागील २४ तासात पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने खडकवासला.वरसगाव.पानशेत आणि टेमघर धरणं आता या पाऊसामुळे फुल्ल झाली आहेत.पुण्यात गणपती बाप्पांचे आगमन झाले.व पाऊसाला सुरुवात झाली.मागील ८ ते १० दिवसांत धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला खडकवासला धरण आता जवळ जवळ भरण्याच्या मार्गावर आहे.धरणातून आजपासून रोज पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.