राज्यात पावसानं दडी मारली : दुष्काळासाठी केलेला वाॅर रुम फक्त देखाव्यासाठी आहेत का? विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे राज्यावर भीषण असं दुष्काळाचं सावट आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणी मध्ये सापडला आहे.शेतकरी वर्गानं खरीपाच्या पेरण्या केलेल्या आहेत . त्यानंतर पाऊस न पडल्याने खरीपाचे बहुतांश पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग करीत आहे.मात्र सुस्त झालेल्या सरकारच्या वतीने कोणताही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला आहे.
दरम्यान याप्रकरणी पुढे बोलताना दानवे म्हणाले की . दुष्काळाचा मोठा फटाका शेतकरी वर्गाच्या मुलांच्या शिक्षणाला बसत आहे.असे त्यांनी ट्विटरवरुन शेअर करून राज्य सरकारवर चांगलाच आसूड ओढला आहे." दोन हाप व एक फुल मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील सातव्या मजल्यावर सुरू केलेला दुष्काळ वाॅर रुम काय माध्यमांनी तयार केलेल्या कुशल प्रशासकाच्या देखाव्यासाठी आहेत का ? दुष्काळाचे परिणाम स्पष्ट दिसत असताना व ग्रामीण व शेतकरी समाजासह संपूर्ण महाराष्ट्राला यांच्या भंयकर झळा सोसाव्या लागत असून सुद्धा राज्य शासन कोणत्याही उपाययोजना करीत नाहीत.किमान थोडीशी तरी नैतिकता राहिली असेल तर या गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने बघा त्यांना आपली पालक म्हणून यावेळी गरज आहे," असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.