पंकजा मुंडे यांना मोठा धक्का! : बीड जिल्ह्यातील परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे दिनांक २४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई केल्या मुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांवर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने ६ महिन्या पूर्वी धाड टाकून काही कागदपत्रे तपासले होते.यात या कारखान्याने १९ कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडविल्याचे स्पष्ट झाले.त्या नंतर औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्यांची एकूण १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.या कारखान्यांच्या अध्यक्षा पंकजा मुंडे या आहेत.
केंद्रीय जीएसटी आयोगाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी करा बाबत नोटीस दिल्या होत्या.या नोटीसला कारखान्यांच्या वतीने काहीच उत्तर न दिल्यामुळे सहा महिन्यांन पूर्वी काही अधिकांऱ्यांनी या कारखान्याला अचानक पणे भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती.या कारखान्यांने बेकायदेशीर रित्या १९ कोटी रुपयांचा कर बुडावल्याचे स्पष्ट झाले.त्या नंतर पोलिस बंदोबस्तात कारखान्याचे बाॅयलर हाऊस आणि व इतर मशनरी असे मिळून १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.या मालमत्तेचे लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार आहे.असे समजते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.