कमी पाऊसमान झाल्यांने नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या झळा : जनावरांना चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची वणवा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री यांची मागणी

पुणे दिनांक ९ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रर्जन्यमान कमी प्रमाणावर झाले आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची तीव्रता भयावह आहे.रब्बी हंगामात पाण्याची स्थिती नसल्याने अनेक शेतकरी वर्गाने पेरणी केली नाही.ही स्थिती जवळपास सर्वच तालुक्यात आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात पाण्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे.जनवारांचा चारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या ह्या शेतकरी वर्गाला आहे.टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.पण तो पण तोटक्या प्रमाणावर आहे.तसेच पाऊस चांगल्याप्रकारे न झाल्याने त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे या भागातील सर्वच शेतकरी बांधव हा शेतीवरच अवलंबून आहे.त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे.या भागात जनावरां साठी चारा छावण्या उभारण्यांची गरज आहे.त्यामुळे काही प्रमाणावर जनवांराच्या चाऱ्यांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल.अशी या भागातील शेतकरी वर्गाच्या मागण्या आहेत.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील लोकप्रतिनिधी यांनी देखील नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे. शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा म्हणून नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.तसेच ही मागणी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या कडे देखील करणार असल्याचे दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.