साखर कारखान्याचे बाॅयलर पेटण्याच्या अधी मजूरांचे आंदोलन मात्र पेटणार : गोपीनाथ मुंडे उसतोड मजूर संघटनेने उपसले संपाचे हत्यार वेतनवाढ मिळत नसल्यामुळे निर्णय

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) साखर कारखान्याचे बाॅयलर पेटण्याच्या आगोदर आता गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेने दरवाढीच्या मुद्द्यावरुन संपाचे हत्यार उपसले आहे.व संप पुकारला आहे.या संपाचे नेतृत्व पंकजा मुंडे या करणार आहे.चालू वर्षात अजून साखर कारखान्याचे बाॅयलर अजून पेटले नसून मात्र ऊसतोड मजूर यांच्या वेतनवाढ साखर सम्राटांनी केल्या नाहीतर हे आंदोलन मात्र साखर कारखान्याचे आधी पेटणार आहे.व या चालू हंगामात पंकजा मुंडे विरुद्ध साखरसंघ व साखर सम्राट लाॅबी यांचा संघर्ष पेटणार आहे.
दरम्यान आज भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवास स्थानी ऊसतोड मजूर यांच्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.याला आमदार राजळे यांनी पाठिंबा दिला आहे.तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यांत वेतनवाढी संदर्भात करार झाला होता.त्यानंतर महागाई मध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे.तरी ऊसतोड मजूर यांची वेतनवाढ मंजूर झाली नाही.त्यामुळे आता ऊसतोड मजूर संघटनांनी चालू ऊस गाळप होण्यापूर्वी ऊसतोड मजूर यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.दरम्यान ऊसतोड मजूर संघटना यांची मुंबईत पदाधिकारी व पंकजा मुंडे यांच्यात बैठक ३० सप्टेंबर रोजी झाली आहे.व या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान पाथर्डी तालुक्यात मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार असल्याने या संपाला पाठिंबा मिळावा म्हणून राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे व यावेळी आमदार राजळे यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.