पुण्यात पावसाने लावली दिवाळीत हजेरी : पुण्यात सिंहगड रोडवरील भागात व बिबवेवाडीत जोरदार पाऊस

पुणे दिनांक १०नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज धनत्रयोदशीच्या दिवशीच पुण्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली असून पुण्यातील सिंहगड रोड व बिबवेवाडीत तुफान असा पाऊस झाला आहे.जवळपासहा पाऊस एका तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होता.
दरम्यान आज सकाळ पासूनच याभागात ढगाळ वातावरण होते.अचानक पाच वाजण्याच्या सुमारास एकदम अचानक पणे मुसाळधार पाऊस सुरू झाला.यात सिंहगड रोडवर सर्वच भागात पाऊस झाला आहे.तर बिबवेवाडी व कोथरूड या भागात देखील मुसळधार पाऊस कोसळत होता.दरम्म्यान अचानकपणे सुरू झालेल्या पाऊसामुळे पुणेकर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.व मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. दरम्यान सिंहगड रोड व धायरी तसेच वडगाव या भागातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.