Mansoon : महाराष्ट्र राज्यात कोसळणार अति मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना रेट अलट॔

पुणे दिनांक ६. ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस इशारा हवामान खात्याच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेड अलरट॔ देण्यात आला आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान काही दिवसांपासून काही ठिकाणी दडी मारली होती. पण आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकणात रेड अलरट॔ देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळणार आहे.तरी नागरिकांना सतर्क राहावे असे हवामान खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे.
तसेच मुंबई मध्ये पण कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आज मुंबईत व ठाण्यात मुसळधार व अती मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रा सह घाट माथ्यावर .खंडाळा. लोणावळा. माथेरण. महाबळेश्वर.वाई. मुळशी. या भागात अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
दरम्यान मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आसल्याची शक्यता हवामान खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे. संभाजी नगर. जालना. परभणी. जळगाव. नंदूरबार. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.