शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी : राज्यात दडी मारलेला पावसाचा जोर आजपासून वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बऱ्याच दिवसांपासून राज्यात दडी मारलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.यामुळे खरीपाच्या पिकांना उशीरा का होईना जीवदान मिळणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . अजून राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.आज विद्रर्भतील काही भागात व मराठवाडा.मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आज विद्रर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुण्यात देखील मुसाळधार पाऊस कोसळणार आहे.असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान पुणे.ठाणे.रायगड.रत्नागिरी.सिंधुदूर्ग.कोल्हापूर .व सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.काही ठिकाणी पाऊस पडत असून नंदुरबार येथील नवापूर शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परभणी.शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली हजेरी लावली आहे.तसेच भंडाऱ्यात देखील पाऊस पडत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.