आज नाशिक व पुण्यासह हाय अलर्ट हवामान विभागाचा इशारा : महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट नागपूर मध्ये ढगफुटी विद्रर्भात सर्वत्र पाऊस

पुणे दिनांक २३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आता दडी मारल्याला पाऊस पून्हा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे.नागपूर मध्ये ☁️ ढगफुटी विद्रर्भात सर्वत्र पाऊस तुफान पाऊस कोसळत आहे.सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.नागपूर व रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर इतर सर्व जिल्ह्यांना येलो अर्लट देण्यात आला आहे.तर उर्वरित जिल्ह्यांत मुसाळधार व वीजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार आहे.अशी शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान नागपूर मध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे.एका रात्रीत १०६ मिली मीटर पाऊस झाला आहे.अनेक घरात पाणी शिरले आहे.नागपूर मध्ये नदीने उग्र रूप धारण केले असून नदीने पात्र सोडून शहरातील चौकाचौकातून पाणी वाहत आहे.तर बस स्टँड देखील पाण्यात आहे.बसच्या काचा प्रर्यत पाणी शिरले आहे. पाऊसामुळे नागपूर मधील जनजीवन विस्कळित झाले आहे.यामध्ये नागपूर महानगरपालिका यात नियोजन करण्यात अपयशी ठरली आहे.नागपूरच्या नागा नदी आता पात्र सोडून शहरातून वाहत आहे.नागपूर मध्ये आता एन डी आर डी एफ व एस डी आर पी एफ घ्या रेस्कू टीम नागपूरात दाखल झाल्या आहेत.नागपूर मधील अंबझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.पाऊसा मुळे नागरिक बसवर चढून बसले आहेत.भंडारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी देखील पाऊस कोसळत आहे.त्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.