आंदोलक व सुरक्षा रक्षक पोलिसांत झटापट : मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला पाटबंधाऱ्यांच्या कार्यालयात राडा.आंदोलक व सुरक्षा रक्षक व पोलिस यांच्यात झटापट

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठवाड्यात आता पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठवाडा पाणी परिषदने आक्रमक झाले आहेत.व आंदोलन छेडले आहे.दरम्यान जायकवडीला पाणी सोडले जावे यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मधील गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात राडा झाला.
दरम्यान जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मराठवाडा पाणी परिषदेने आज गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यालय गाठले परंतु यावर पाणी प्रश्न बाबत संचालक कोणतेही उत्तर देवू शकत नसल्याने यावेळी संतप्त झालेल्या आंदोलंकानी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न प्रयत्न केला.त्यावेळी सुरक्षा रक्षक.पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.त्या वेळी आंदोलक कार्यकारी संचालक यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला.पण त्यांना अडविले त्यानंतर आंदोलक यांनी दालनातच ठिय्या आंदोलन केले जवळपास हा राडा बराच वेळ सुरू होता.कार्यकारी संचालक यांनी आंदोलकांशी चर्चा केली.व त्यांचे निवेदन स्वीकारले नंतर आंदोलक शांत झाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.