आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता?

पुणे दिनांक १५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेजण काका पुतणे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता आहे.आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.अजित पवार हे कार्यकरी मंडाळा वर सदस्य आहेत.त्यामुळे ते या बैठकीसाठी उपस्थित राहणा्याची शक्यता आहे.आता बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या बैठकीला अन्य नेतेमंडळींनी जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.जेष्ठ नेते शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत.व त्यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मंडाळांची बैठक होत असते.सदरची बैठक आज पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे होत आहे.याबैठकी साठी अन्य नेते जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.ऊस उद्योग संदर्भात शास्त्रीय व तांत्रिक व शौैक्षणिक संशोधन करण्यासाठी करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.मांजरी बुद्रुक पुणे येथे या संस्थेचे काम चालते .आज या संस्थेत कार्यकरी मंडाळाची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.व उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संस्थेत कार्यकरी मंडाळा वर सदस्य आहेत.ते मुळे ते आज काकांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीत पुतणे आज उपस्थित राहणार का.? याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.