विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता : पुण्यात रात्री पसून रिमझिम पाऊसाला सुरुवात वादळी वारे सुटणार

पुणे दिनांक २ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान मध्यातरी पाऊसाने दडी मारल्याने अनेक नागरिक चिंतेत होते पण काल रात्री पसून रिमझिम पाऊस कोसळत आहे. जवळ पास एक महिन्याच्या विश्रांती नंतर पाउस कोसळत आहे.त्यामुळे नागरिकांनसाठी आनंदाची बातमी आहे.व पाऊस सुरू झाल्यामुळे उकाड्यापासून पुणेकरांची सुटका झाली आहे.
दरम्यान काल रात्री पसून मुंबई व पुण्यात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे.काल रात्री ८ ते सकाळी ८ वाजण्याच्या कालावधीत मुंबई मध्ये ३.०८ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.तर पुण्यात रात्री ८ ते सकाळी ८ वाजण्याच्या कालावधीत १९ मी मी पाऊसाची नोंद झाली आहे.तसेच आता देखील पाऊस सुरू आहे.व रिपरिप सुरू आहे.आज पुणे शहर व जिल्ह्यात पाऊसांच्या सरी कोसळत आहे.दरम्यान हवामान खात्याच्या वतीने कळविण्यात आले आहे की.उद्या वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.तर या भागात.सातारा.सांगली.नांदेड.लातूर अमरावतीत.भंडारा.बुलढाणा.चंद्रपुर.गडचिरोली.गोंदिया.नागपूर. वर्धा.वाशिम.व यवतमाळ.परभणी.बीड.या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह व विजेच्या कडकडाटात पाऊसाची शक्यता आहे.असे हवामान खात्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.