राज्यात दडी मारलेला पाऊस पून्हा सक्रिय : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाच्या वतीने २४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

पुणे दिनांक १५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात मागील महिन्यापासून दडी मारलेला पाऊस सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला आहे.पाऊसाबाबत हवामान विभागाच्या वतीने आज पासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.चार जिल्ह्यात मुसळधार पाऊस ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.यामध्ये पुणे.मुंबई.ठाणे. सह राज्यातील एकूण २६ जिल्ह्यात मुसळधार व काही ठिकाणी अतिमुसाळधार पाऊस पडणार आहे.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
दरम्यान पुणे शहरासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा शक्यता आहे.असा हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.व त्याची त्रीवता वाढलेली आहे.त्यामुळे पाऊसा साठी पूरक वातावरण निर्माण झाल्या मुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार व मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान पूर्व विदर्भात जोरदार पाऊस व ऑरेंज अर्लट तर उर्वरित विद्रर्भसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात येलो अर्लट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यात पावसाचा येलो अर्लट हवामान खात्याने दिला आहे.आगामी चार दिवस हा पावसाचा जोर रहाणार आहे.दरम्यान गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री पासून पाऊस सुरू आहे भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने येलो अर्लट देण्यात आला आहे.दरम्यान गोसीखुर्द धरणांचे १५ दरवाजे अर्धा मीटर उंचीवर उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतकर्तचा इशारा देण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.