पुण्यातील चारही धरणक्षेत्रात चांगला पाऊस : पानशेत व वरसगाव धरणांमधून प्रत्येकी ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

पुणे दिनांक ९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे व खडकवासला प्रकल्पातील चारही धरणक्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला आहे.त्यामुळे धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याने पानशेत व वरसगाव धरणाच्या पाॅवर हाऊसद्वारे प्रत्येकी ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.खडकवासला प्रकल्पात एकूण २७.१६ टीएमसी ९३.१७ टक्के इतक्या पाणी साठा आहे.
दरम्यान शुक्रवारी दिवसभर खडकवासला -१३ पानशेत १८. वरसगाव -२० व टेमघर धरण क्षेत्र २५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.यापूर्वी खडकवासला धरण व पानशेत धरण आधीच १०० टक्के भरले.न त्यां नंतर दहा दिवसांपूर्वी खडकवासला प्रकल्पातील सर्वात मोठे धरण वरसगाव देखील १०० टक्के भरले.खडक वासला धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.