सरकारकडे १लाख ७० हजार बंफर स्टाॅक कांदा येणार बाजारात शेतकरी आणि सरकार संघर्ष वाढणार : उन्हाळी कांदा पोहचला साडेपाच हजारांवर ,आवक घटल्याने बाजारभावत उसाळी.बाजारपेठात ६० टक्केच आवक कांद्याला मात्र मोठी मागणी

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात खाली कोसळलेले कांद्याचे दर वाढत आहे.आता सद्य स्थितीत मार्केट मध्ये फक्त ६० टक्के कांदा असून आता मार्केट मध्ये कांद्याला साडेपाच हजारांच्या पुढे चांगला बाजारभाव आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे.त्यांना मिळत आहे.सोलापूरात तर मार्केट मध्ये गुरूवारी कांद्याला उंच्चकी सात हजार रुपये प्रति क्विंटल हा दर मिळाला आहे.पण राज्य सरकारने खरेदी केलेला कांदा हा तब्बल १ लाख ७० हजार एवढा बंफर स्टाॅक आहे.आणी मार्केट मध्ये कांद्याचे बाजारभाव वाढल्यास सरकार हा बंफर स्टाॅक बाहेर काढेल व आता कुठं शेतकरी वर्गाला दोन पैसे मिळत असताना सरकारने हा कांदा मार्केट मध्ये आणल्यास शेतकरी व सरकार यांच्यातील संघर्ष नक्कीच वाढणार आहे.
दरम्यान मागील वर्षी रब्बी उन्हाळा कांदा हंगामात मोठी लागवडी झाल्या होत्या मात्र कांदा वाढणीच्या स्थितीत असतांना रोगांचा प्रादुर्भाव कांद्यावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट झाली तसेच एप्रिल व मे या कालावधीत कांदा काढणीस आला तर वादळ वाऱ्यासह पाऊस अवकाळी. व गारपीट या नैसर्गिक अप्पतीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाचे नुकसान झाले.व परिणामी कांद्याचे उत्पादन घटले.राहिलेला कांदा बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी वर्गाच्या वतीने कांद्याच्या वखारी करुन कांदा साठवणूक करुन ठेवण्यात आला होता.यात जिवाणू जन्य सड होउन साठवणूक क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परीणाम झाला.त्यामुळे शेतकरी वर्गाला कोट्यवधी रुपयांची झळ बसली.
आता यातून काही थोडाफार कांदा शिल्लक आहे.त्याचा फायदा शेतकरी वर्गाला मिळत आहे.दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याच्या दरात मोठी उसळी घेतली असून गुरुवारी या मार्केटमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ७००० हजार रुपयांच्या पुढे बाजार भाव पोहचला होता.तर सरासरी कांद्याचा बाजारभाव हा साडेचार हजार रुपये होता.आता मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पण मार्केट मध्ये कांद्याची आवक कमी प्रमाणावर आहे.त्यामुळे कांद्याच्या बाजारभाव वाढले आहेत. व अशातच सरकारने त्यांच्याकडील १ लाख ७० हजार एवढा बंफर स्टाॅक बाहेर काढला तर शेतकरी व सरकार यांच्यातील संघर्ष मात्र नक्कीच वाढणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.