Monsoon : चातका प्रमाने वाट पाहणाऱा शेतकरीवर्ग वरूण राजाच्या अगमणाने सुखवला. पुणे शहर व जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस.

पुणे.दिनांक २४.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )ज्याची अगदी चातका प्रमाने वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात वरूण राजाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून पावसाच्या सरी पडत आहेत. आज सकाळपासून पासूनच ढगाळ वातावरण होते. पाऊसा मुळे. वातावरण आल्हाददायक झाले आहेत.
दरम्यान चालू वर्षाच्या हंगामात वरूण राजाने उशिरा हजेरी लावली आहे.जून महिन्यात सरा सरी पाऊसाची नोंद झाली नाही. नाहीतर जून च्या पहिल्या आठवड्यात सरा सरी १००.मिली मीटर पाऊसाची नोंद होते. पण ती झाली नाही. धरणांनी पण तळ घाटला होता. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्गा बरोबर शहर वासिये देखील होते. आज पाऊस झाल्या मुळे. सर्वांचीच चिंता आता मिटलेली आहे. हवामान खात्यने पाऊस ऊशिरा येणार असल्याचे आधिच अंदाज वर्तवला होता. शेतकऱ्यांन साठी जून च्या पहील्या आठवडय़ात मूग नक्षत्रात पाऊसाची प्रतीक्षा असते. परंतू मूग नक्षत्रात पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या झाल्या नाहीत. शेतकऱ्यांन साठी मूग नक्षत्र कोरडेच गेले. पण आता आदरा नक्षत्रात पाऊस पडल्या मुळे शेतकरी खोळंबलेल्या पेरण्या साठी सज्ज झाला आहे पंरतू शेतकऱ्यांनी पेरण्यची घाई करू नये. १००.मिली मीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या करावेत असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पुणे शहरात. आज शिवाजी नगर. विद्यापीठ चैक. गोखले नगर. बाणेर रोड. औध. सांगवी. कात्रज. धायरी. वडगाव भागात सकाळ पासून सरी कोसळत आहे. काही ठिकाणी रोडवर पाणी साचले होते तसेच काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. कोकण.मुंबई. सह विदर्भ. कोल्हापूर सातारा सांगली. या भागात देखील पाऊस चालू आहे. पाच दिवस असाच पाऊस राहणार आहे.पुणे. सातारा. कोल्हापूर. नाशिक. अदी शहरात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. आजच्या पाऊसा मुळे रत्नागिरीतील आंबा घाटात दरड कोसळली गायमुख या ठिकाणी गणेश मंदिरच्या छतावर कोसळली पण यात कोणतेही हानी झाली नाही. पुढील ३ ते४ तासात रायगड. ठाणे. पालघर. मुंबई. या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.असे हवामान खात्यने म्हणले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.