Mansoon : महाराष्ट्रात काहीकाळ थांबलेला पाउस पुन्हा सक्रिय होणार , काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

पुणे दिनांक ४ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) महाराष्ट्रातकाहीकाळ पाऊसांने विश्रांती घेतली होती. परंतु पुन्हा एकदा पाऊस लवकरच सक्रीय होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. यामुळे राज्यातील काही भागातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. या बाबत दिनांक ४ ऑगस्ट रोजी पुणे हवामान खात्याच्यावतीने पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे.रायगड. रत्नागिरी. पालघर.नाशिक व औरंगाबाद यासह मराठवाडा येथील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील काही भागात सध्या कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच हवामान खात्याच्यावतीने राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊसांची शक्यता वर्तवली आहे.या बरोबर कोकणभागासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना पाऊसांचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी सातारा .पुणे. ठाणे. पालघर. रत्नागिरी. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.