८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनांचा राज्य सरकारला अंदाज : १ नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम होणार सुरू.मंत्रीमंडाळाच्या बैठकीत निर्णय ऊसतोड मजुरांच्या मागण्या बाबत निर्णय नाही

पुणे दिनांक १९ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली.सदरच्या बैठकीत चालू वर्षाचा ऊसाचा हंगाम हा १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.दरम्यान चालू हंगामात ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनांचा अंदाज राज्य सरकारच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.व राज्य सरकारच्या वतीने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसतोड मजुरांच्या सपांबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही.
दरम्यान ऊसाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत एकूण पाच टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या अंदाजे मुळे साखर उत्पादनांत देखील यावर्षी काही प्रमाणावर घट होणार आहे .काही ठिकाणी प्रर्जन्यमान कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी हे ऊस तोडणी करून जनावरांना चारा म्हणून घालत आहे .तसेच चालू वर्षात पर्जन्यमान कमी झाल्याने याचा फटका व काही साखर कारखाने हे शेतकरी वर्गाने साखर कारखान्याला ऊस घालून काही साखर कारखाने हे ऊसाचे पेंमेड वेळेवर देत नसल्याने शेतकरी वर्गाचा कल हा गुऱ्हाळकडे असतो.तर काही शेतकरी गवळी लोकांना चाऱ्यासाठी ऊस देतात त्याला चांगला बाजारभाव मिळतो व विषेश म्हणजे पेंमेड हा लगेच हातावर मिळत असल्याने त्यांचा कल मोठ्या प्रमाणावर असतो.त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस मिळत नाही व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर संपतो व साखरचे उत्पादन देखील घटत आहे.तसेच चालू ऊसतोड हंगामात ऊसतोड मजुरांनी देखील मागील तीन वर्षांपासून त्यांच्या पेंमेडच्या करार मध्ये कोणतीच वाढ न केल्यामुळे ते ऊसतोड मजूर यांनी देखील संपाची हाक दिली आहे.पण याबाबत मंत्रीमंडळात कोणताच निर्णय झालेला नाही.एकंदरीत ऊस गाळपांचा चालू हंगामात सरकार पुढे अडचणी असणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.