आजही ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस : पुण्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने पुणेकरांना झोडपून काढले.तसेच जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस.आजही पावसाची शक्यता

पुणे दिनांक ११नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात सायंकाळी हजेरी लावली सर्वत्रच वीजेच्या कडकडाटासह मुसाळधार पाऊस झाला आहे.या पाऊसामुळे काढणीस आलेल्या साळीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पुणे शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात हा मुसाळधार पाऊस झाला आहे.पुणे जिल्ह्यात खेड.जुन्नर आंबेगाव.मावळ.लोणवळा.अवकाळी पाऊस मुसळधार झाला आहे.तसेच अहमदनगर जिल्ह्यात देखील संपूर्ण भागात अवकाळी पाऊस झाला आहे.मुंबई.व कोकणात चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे.या पाऊसामुळे दिवाळी साठी आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना पाऊसामुळे झाल्यांने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.त्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करायला लागला आहे.
दरम्यान आज देखील येत्या ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे.असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.यात कोकण भागात रत्नागिरी.सिंधुदुर्ग.पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर.सातारा. सांगली.व सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मराठवाडा व विदर्भ मधील काही जिल्ह्यात. अवकाळी मुळधार पाऊस कोसळणारआहे .असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.