Amul MD Resigns : अमूलचे MD आरएस सोढी यांनी राजीनामा दिला, GCMMFC चे COO जय मेहता यांची अंतरिम MD म्हणून नियुक्ती

'अमूल' या ब्रँड नावाने प्रसिद्ध असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा आरएस सोढी यांनी राजीनामा दिला आहे. जयन मेहता, COO, GCMMF, यांना आता हे पद सोपवण्यात आले आहे. मेहता यांच्याकडे केवळ तात्पुरता कार्यभार देण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, सोमवारी चेअरमन शामलभाई पटेल आणि व्हाईस चेअरमन वलमभाई हुंबळे यांच्या नेतृत्वाखाली गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) च्या बैठकीत आरएस सोढी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. GCMMF ही मूळ कंपनी आहे जी अमूल ब्रँड चालवते.
आर एस सोढी यांच्या दूरदृष्टीने अमूलला नवी उंची दिली
2010 मध्ये, अमूलची कमान आरएस सोढी यांच्या हातात गेली, जे गेली 30 वर्षे अमूलशी संबंधित होते. त्यांनी पुरवठा साखळीत काही बदल केले आणि अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली, ज्यामुळे अमूलला पुन्हा रुळावर आणले. इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) येथून त्यांनी MBA केले. 2017 मध्ये सोढी यांना अमूलचे MD म्हणून 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. सोधी यांनी त्यांच्या कारकिर्दीला अमूलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक सेल्स म्हणून सुरुवात केली. 2000 ते 2004 या कालावधीत त्यांनी अमूलच्या विपणन महाव्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळली. सोढी यांचे पूर्ण नाव डॉ. रुपिंदर सिंग सोढी आहे.
जुलै 2022 मध्ये इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष बनले
कोऑपरेशन मिनिस्टर अमित शहा यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये सांगितले होते की, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी (MSCS) तयार करण्यासाठी अमूलचे इतर पाच कोऑपरेटिव सोसाइटीज मध्ये विलीनीकरण केले जाईल. जुलै 2022 मध्ये, सोढी यांची भारतीय डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही देशातील डेअरी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे.
आरएस सोढी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी अमूलच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी स्वीकारणाऱ्या जयन मेहता यांना यापूर्वीही प्रभारी बनवण्यात आले होते. 2018 साली जेव्हा तत्कालीन MD के. रथनम यांनी राजीनामा दिला तेव्हाही मेहता यांची प्रभारी MD म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.