व्यापार : काॅम्पूटर लॅपटॉप टॅबलेट सर्वर या आयातवर केंद्र सरकारचे निर्बंध .स्वदेशी मालाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

पुणे दिनांक ३ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) काॅम्पूटर लॅपटॉप टॅबलेट. सर्वर आता या उपकरणावर केंद्र सरकारने आयातीवर निर्बंध लादले आहेत. स्वदेशी मालाला प्रोत्साहन देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. व बाहेरच्या देशातून उदाहरणार्थ चीन मधून आयात होणा-या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना या नवीन नियमांमुळे चांगलाच आळा बसणार आहे. आता या पुढे या उपकरणांची आयात करण्यासाठी परवाना किंवा परवानगी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान विदेश व्यापार महासंचालनायाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नवीन नियामावली नुसार यापुढील काळात परवानाधारक व आयातदारांना एकावेळी २० पेक्षा अधिक काॅम्पूटर लॅपटॉप टॅबलेट सर्वर आयात करता येणार नाहीत .या नवीन नियमा मुळे आता या उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. व राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. व त्याच प्रमाणे परदेशातून चीन सारख्या देशांतून होणा-या आयातीला आळा बसेल असा केंद्रसरकारचा दावा आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.