Electricity Bill Hike : महाराष्ट्र राज्यात अगदी दिवाळी सणाच्या काळात नागरीकांना वीजेचा शाॅक बसणार ?

महाराष्ट्र राज्यात अगदी सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठा शॉक देण्याची न्यूज आहे. राज्यातील वीजदर वाढ होणार आहे. सदरची विजेची दरवाढी करिता महावितरण विभागाने राज्य विद्युत नियमक आयोगाची चर्चा केली आहे. याच वेळी वीज दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामुळे आता वीज दरवाढीचे अगदी सणासुदीच्या तोंडावर व सध्या प्रचंड असणाऱ्या महागाईच्या खाईत सर्वसामान्य नागरिक असताना पुन्हा वीज दरवाढीच्या संकेतामुळे. नागरिकांच्या खिशावर अजून काही नव्याने ताण बसणार आहे.
दरम्यान यात झालेल्या बैठकीत वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरण कंपनीला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले असल्याचे सूत्रानद्वारे कळते. तसेच मागील कोविडच्या काळात लोक डाऊन असल्यामुळे. महावितरण कंपनीने वीज बिल देखील वसुली केली नाहीत. यात एकूण ७०. हजार कोटी रुपांयांच्या थकीत बीलांचा समावेश आहे. याबाबत महावितरण कंपनी महागड्या वीज खरेदी बाबतचा अहवाला देत आहे. मात्र कंपनी नागरिकांकडून अगोदरच इंधन समायोजन शुल्कच वसूल करत आहे. मात्र इकडे ग्राहकांकडे असणाऱ्या थकबाकी वसूल न करण्यात आलेल्या अपयशाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे बसणार आहे. असे दिसते. राज्य सरकारकडूनच येणारी थकबाकीची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये पाणीपुरवठा व पथदिवे याचा समावेश आहे. याचीच वसुली वितरण कंपनीकडून करण्यात आली नाही. याची एकूण थकीत बीलांची आकडेवारी एकूण २४ कोटी रुपयांची आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.