व्यापार : गौतम अदानींची सिंमेट क्षेत्रात गरूडझेप , विकत घेतली सिंमेट क्षेत्रातील दुसरी एक मोठी कंपनी?

पुणे दिनांक ३ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आता अदानी समुहाच्या पोर्टफोलिओमध्ये एका नव्या व मोठ्या कंपनीचा समावेश झाला आहे. सिमेंट क्षेत्रात आपला चांगल्याच प्रकारे दबदबा वाढवत गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या वतीने संघी सिमेंटचं अधिग्रहण केल्याचे जाहीर केलं आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या प्रोमोटर्सकडून एकूण ५६.७४ टक्के स्टेक घेणारआहे.
दरम्यान आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी गुरूवारी शेअर बाजार सुरु होण्यापूर्वी गौतम अदानी यांच्या कंपनीनं हा करार झाल्याचं जाहीर केलं. कंपनीनं सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केल्याचं सांगितलं या बाबत बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्ता नुसार अंबुजा सिमेंटनं केलेला हा सौदा ५००० कोटी रूपयांचा एंटरप्रायझेस व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रमोटर समूह रवी सांघी ॲड फॅमिलीकडून संघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे. कंपनीच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की.हे अधिग्रहण संपूर्णपणे अंतर्गत स्त्रोतांमधून केलं जाईल.
दरम्यान अंबुजा सिमेंट आणि संघी इंडस्ट्रीज यांच्यातील या करारा बाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की.या करारामुळे अंबुजा सिमेंटची प्रतिमा बाजारपेठेत उंचावणार आहे.या अधिग्रहणांमुळे आम्ही २०२८ पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू.अदानी यांच्या मते कंपनी सिमेंट उत्पादनात १४० एमटीपीए लक्ष गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. संघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे.आणि संघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील २ वर्षांत १५ एमटीपीएपर्यंत वाढवेल .असे ते म्हणाले.
या कराराच्या घोषणा नंतर लगेचच अंबुजा सिमेंटचे शेअर्स गुरूवारी जवळपास एक टक्क्यांनी वाढून ४६६.६.रूपायांवर पोहचला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.