नवी मुंबई मधील तीन एपीएमसी मधील मार्केट बंद : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला माथाडी कामगारांचा पाठिंबा, उद्या एपीएमसी मधील तीन महत्त्वाच्या बाजारपेठा बंद राहणार

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणांच्या आंदोलनाला आता माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता नवीमुंबई माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे.त्यामुळे उद्या शुक्रवारी दिनांक २७ ऑक्टोबर रोजी एपीएमसीच्या तीन बाजारपेठा बंद राहतील यातील भाजीपाला व फळमार्केट मात्र सुरू राहील दरम्यान कांदा आणि बटाटा 🥔 मार्केट दाना आणि मसाले बाजारपेठ या बंद राहतील.
दरम्यान आज झालेल्या माथाडी कामगारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील या बैठकीला उपस्थित होते.त्यामुळे आता माथाडी कामगारांनी देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दरम्यान आता संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणांचा आंदोलनांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणचा दुसरा दिवस आहे.संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण बाबत संतापाची लाट उसळली आहे.मराठा समाजाचे तरुण आरक्षण साठी आत्महत्या करत आहेत.उद्या नवीमुंबई मधील अत्यत महत्वाच्या बाजारपेठा बंद राहणार आहेत.यामुळे व्यापारी व शेतकरी वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.