Jammu and Kashmir : आता जम्मू काश्मीर मध्ये ही दुग्धक्रांती !

शेतीला महत्त्वाचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडं (Dairy Business) बघितलं जातं. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला जातो. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही (Jammu-Kashmir) दूध उत्पादनाला (Milk Production) चालना देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. 350 कोटी रुपयांचा खर्च करुन 600 उद्योग विकसित केले जाणार आहेत. यातून 16 हजार नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत.
भारतातील मोठी लोकसंख्या दूध उत्पादनाशी निगडित आहे. दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. पशुपालकांना मदत करण्यासाठी प्राण्यांचा विमा देखील काढला जातो. याशिवाय सरकार दुग्ध व्यवसायासाठी अनुदानही देते. आता जम्मू काश्मीरमध्येही दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याचा राज्यातील सर्व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
दूध उत्पादनात 70 टक्के वाढ करण्याचा निर्धार
जम्मू-काश्मीर प्रशासन पशुपालकांना सतत मदत करत आहे. सध्याच्या कृती आराखड्यानुसार पुढील पाच वर्षांत दूध उत्पादनात 70 टक्के वाढ करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील प्रत्येकाला मिळेल.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.