Entrepreneurs and start ups : अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी "इन्क्यूबेशन फॉर न्यू जनरेशन आंत्रप्रेन्युअर्स अँड स्टार्ट-अपस्" उपक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ‘इन्क्यूबेशन फॉर न्यू जनरेशन आंत्रप्रेन्युअर्स अँड स्टार्ट-अपस्’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ नोव्हेंबर पर्यंत प्रवेश अर्ज देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये निवासी, अनिवासी उद्योजकता, तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा डोमेन, क्षेत्र निहाय अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. आयटीआय उत्तीर्ण, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेल्या अथवा शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, २ अद्यावत छायाचित्रे फोटो अर्जासोबत जोडावेत. प्रवेश अर्ज आणि आवश्यक कागदपत्र जोडलेल्या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी तर मुलाखत २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामधून एकूण ४० अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मुख्य उपक्रमासाठी निवडण्यात येणार आहे.
मुख्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता पूर्वतयारी म्हणून उद्योजकता परिचय कार्यक्रम, नव्या पिढीचे उद्योजक म्हणून नावीन्यपूर्ण कल्पना सादरीकरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार (९४०३०७८७५२) आणि विभागीय अधिकारी सुदाम थोटे (९४०३०७८७५३) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेट जवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे - ४११००५ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.