Paytm payment Bnak : पेटीएम पेमेंट्स बँकेला भारत बिल पेमेंट ऑपरेटींग एंटिटी म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली

पेटीएम पेमेंट्स बँकेने सोमवारी सांगितले की, तिला भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट (BBPOU) म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) BBPOU ला वीज, फोन, DTH, पाणी, गॅस विमा, कर्जाची परतफेड, FASTag रिचार्ज, शैक्षणिक शुल्क, क्रेडिट कार्ड बिल आणि नगरपालिका कर भरण्याची परवानगी देते.
BBPS ची मालकी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आहे. आत्तापर्यंत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) आरबीआयच्या तत्वतः मान्यतेनुसार अशा सेवा पुरवत होती. PPBL ला RBI कडून भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट (BBPOU) म्हणून पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स कायदा, 2007 अंतर्गत काम करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Delhi News, Paytm payment Bnak News, Delhi Business News, latest Delhi marathi news and Headlines based from Delhi City. Latest news belongs to Delhi crime news, Delhi politics news, Delhi business news, Delhi live news and more at Polkholnama.