Maharashtra Udyog Ratna Award RatanTata : जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.उद्दयोगरत्न हा पुरस्कार या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे.त्यांना शाल पुष्पगुच्छ उद्योगरत्न पुरस्काराने व सन्मानचिन्ह व २५ लाख रुपयांचा धनादेश आणि रतन टाटा यांचं पोट्रेट देत सन्मान करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान यावेळी उद्द्योग मंत्री उदय सामंत.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष टी.चंद्रशेखर.उद्योग विभागांचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे.एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपीन यावेळी उपस्थित होते.केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही रतन टाटा यांना सन्मानित केलं आहे सन २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जगातील १०० प्रभावीशाली व्यक्तींच्या यादीतही रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.