Swa nidhi yojana : पथ विक्रेत्यांनी आपल्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री स्व निधी योजनेचा लाभ घ्यावा - उल्हास जगताप

पथ विक्रेत्यांनी आपल्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री स्व निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाधववाडी चिखली येथे पथ विक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री स्व निधी योजने बाबत माहिती कर्ज मंजूरीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते. समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी दत्तात्रय कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री स्व निधी योजनेच्या लाभार्थ्यांना अर्जांचे वाटप करण्यात आले तसेच बँका साठी द्यावयाचे शिफारस पत्र देण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाचे योजनांची माहिती उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली व त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या या शिबिरात सुमारे दोनशे पथ विक्रेत्यांनी सहभाग घेतला.
पथ विक्रेत्यांनी आपल्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री स्व निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाधववाडी चिखली येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार पथ विक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री स्व निधी योजनेबाबत माहिती व कर्ज मंजुरीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते.
यावेळी सदर शिबिरास अतिक्रमण विभागाचे संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, राजश्रीसातळीकर, शितल भोसले, साधना ठोंबरे, समूह संघटक जावजी पोटे, सुप्रिया करंजकर, वैशाली सोनवणे,
अनिता साकोरे, संगणक चालक मनोहर जगताप, व लिपीक समीऊल्ला नदाफ आदी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.