ऑनलाइन फूडची ऑर्डर देणाऱ्यांचे वाजणार तीन तेरा.... : झोमॅटोचे डिलीव्हरी बाॅय त्यांच्या मागण्या साठी आजपासून संपावर; संपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा कामगारांना पाठिंबा

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) घर बसल्या नागरिकांना ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवणारी फूडची कंपनी झोमॅटोचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांन साठी आज पासून संपावर जाणार असल्याने.मुंबई मधील सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे.दरमयान या संघटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व डिलिव्हरी बॉय हे लढा देणार आहेत.
दरम्यान त्यांच्या विविध मागण्यांन संदर्भात मुंबई मधील झोमॅटो डिलिव्हरी बॉय यांनी पुकारलेल्या संपामुळे घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या मुंबई करांचे प्रचंड प्रमाणावर हाल होणार आहे. दरम्यान आज पासून संपावर गेलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय यांच्या मागण्या १) सर्व डिलिव्हरी बॉय यांना समान ऑर्डर मिळाव्यात व 💸 पैसे विाढवून मिळावेत २) पीक अप ३ किलोमीटर व ड्राॅप ७ किलोमीटर असावा.३) जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पून्हा कामावर घ्यावे ४) रायडर बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना इन्शुरन्स मिळावं ५) इंसेटिव्ह सर्व कामगारांना समान मिळावा.या पाच मागण्या या संपावर गेलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय यांच्या आहेत.
.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.