Jailed : खुनाच्या प्रयत्नांच्या दोेन गुन्हयांतील 08 आरोपी केले जेरबंद

१४ ऑक्टोबर २०२२ रोजी दत्तवाडी पो.स्टे. गु.र.नं. 236/2022 भा.द.वि. कलम 395, 307, 143, 147, 148, 149, 341, 504, आर्म ऍक्ट कलम 4(25) महा. पोलीस अधि. कलम 37(1) सह 135, क्रिमीनल लॉ.अमेंटमेंट ऍक्ट कलम 7, यातील फिर्यादी व दत्तवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 237/2022 भा.द.वि. कलम 307, 143, 147, 148, 149, 341, 504, आर्म ऍक्ट कलम 4(25) महा. पोलीस अधि. कलम 37(1) सह 135, क्रिमीनल लॉ.अमेंटमेंट ऍक्ट कलम 7 यातील फिर्यादी या परस्पर विरोधी दाखल झालेल्या गुन्हयामधील आरोपींचा शोध सहा पोलीस आयुकत श्री सुनिल पवार सिंहगड रोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे चार पथके तयार केली होती.
पथकामधील पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे व तपास पथक स्टाफ घेत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे,प्रशांत शिंदे व नवनाथ भोसले यांना वरील गुन्हयांमधील आरोपी सिंहगड रोड, पानमळा, मित्रमंडळ परीसरात वेगवेगळया ठिकाणी लपुन बसले आहेत. सदर बातमीनुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचुन एकुण 08 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले त्यापैंकी 02 विधीसंघर्षीत बालक आहेत. इतर आरोपींची नावे पुढील प्रमाणे 1) वैभव रविंद्र गोरड वय 25 वर्षे, रा. गल्ली नं. 22 जनता वसाहत महेश लॉन्ड्री मागे, पर्वती पुणे 2) अविनाश ऊर्फ अभि अजय मिसाळ रा. घोरपडी बाझार गाव घोरपडी पोलीस चौकी मागे, वानवडी पुणे 3) कृष्णा चंद्रकांत वाघमारे वय 22 वर्षे, रा. पाचवा मजला लक्ष्मीनारायण टॉवर्स सिंहगड रोड, दांडेकर पुल, पुणे 4) आकाश बापु म्हस्के वय 25 वर्षे, रा. सव्र्हे नं. 132 दांडेकर पुल सिंहगड रोड पुणे 5) ओंकार तानाजी ओव्हाळ वय 24 वर्षे, रा. महालक्ष्मी बिल्डींग, सिंहगड रोड, दांडेकर पुल, पुणे 6) राम मोहन बनसोडे वय 22 वर्षे, रा. सिध्दार्थ कंपनीजवळ सव्र्हे नं. 132 दांडेकर पुल सिंहगड रोड पुणे असे असुन दाखल दोन्ही गुन्हयांत संबधीत आरोपींना अटक करण्यात आली असुन उर्वरीत गुन्हयांतील आरोपींचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
अटक आरोपीं पैकी काही जण पोलीस रेकॉर्डवरील असुन सर्वजण राहण्यास दांडेकर पुल सिंहगड रोड परीसरात आहेत. सदर गुन्हे हे पुर्व वैमनस्यातुन घडल्याचे आतापर्यंतचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयांचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक किशोर तनपुरे व चंद्रकांत कामठे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. राजेंद्र डाहाळे, मा.पोलीस उप-आयुक्त परि. 3 श्रीमती पौर्णिमा गायकवाड, मा.सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री.सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री.विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील चंद्रकांत कामठे, किशोर तनपुरे पो. अंमलदार कुंदन शिंदे, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे, सद्दाम शेख व अमोल दबडे ज्ञाने·ार शिंदे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.