Crime : कॅन्सर टाटा हाॅस्पीटल मधील अधिकारी व कर्मचारी यांनी पेंशडच्या चाचण्या च्या माध्यमातून लाखो रूपये लुटल्या प्रकरणी ११जण गजाआड

पुणे दिनांक १८ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई मधील परळ येथील टाटा कर्करोग हाॅस्पीटल मध्ये काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांनी कमीशनच्या नावा खाली रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करून त्यांना अक्षरशः लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेंशडच्या विविध चाचण्या करण्या साठी खासगी निदान केंद्रात पाठवून अधिकारी व कर्मचारी कमिशन उकळत होते. या हाॅस्पीटल मधील २१ व एका निदान केंद्राचा व्यवस्थापक व आरोपी विरोधात भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून एकूण ११ जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत .
मुंबईतील परळ येथील टाटा कर्करोग हाॅस्पीटलमध्ये भारत भरातून रूग्ण उपचारा करिता येतात .नेमकी हिच संधी साधत हाॅस्पीटल मधील अधिकारी व कर्मचारी परिचारक रूग्णाच्या नातेवाईकांना गाठून खासगी निदान केंद्रात चाचणी करून घ्या.लवकरच चाचणी होउन त्याचा अहवाल लवकरच मिळेल व त्या नंतर लगेचच पुढची प्रकिया सुरू करण्यात येईल या हाॅस्पीटल मध्ये चाचण्या करण्यात वेळ लागतो व तुमच्या पेंशडवर उपचारा साठी वेळ लागेल त्या मुळे खाजगी निदान केंद्रात चाचणी करून घ्यायचे त्या बाबत या कर्मचारी व अधिकारी यांना खासगी निदान केंद्रातून कमिशन मिळत असें .हा पेंशडच्या नातेवाईकांना लुटण्याचा प्रकार टाटा हाॅस्पीटल मधील सुरक्षा अधिकारी यांना समजला .यातील दोन कर्मचारी यांना खासगी निदान केंद्रातून ३ लाख रुपये कमिशन घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. व सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करून त्यांना भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले. पोलीसांनी या प्रकरणी एकूण ११ जणांना विरोधात भा दा वी .कलम ४२०.४०९.४०६.३४.अन्वये गुन्हा दाखल करून ११.जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत .
दरम्यान टाटा हाॅस्पीटल प्रशासनाच्या वतीने या सर्व पार्श्वभूमीवर गंभीर दाखल घेण्यात आली असून लाचखोर संबधित कर्मचारी यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. व दोषी कर्मचारी यांच्यवर बंडतर्फ करण्यात येइल असे हाॅस्पीटल च्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.