Pune crime : पुणे शहर येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन 20 जणांवर कारवाई करून एकुण 1,14,660/- रू चा मुद्देमाल जप्त

२७ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीकृष्ण मंदिरा जवळ,भाटनगर येरवडा परिसरात बेकायदेशीरपणे मुंबई मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे,शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता,काही व्यक्ती बेकायदेशीर मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे असे 10 व्यक्तीांना ताब्यात घेवुन,त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण 18,580/- रू. किचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. सदर प्रकरणी नमुद 10 व्यक्ती व पाहिजे व्यक्ती 01 असे एकुण 11 व्यक्तीांविरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं.466/2022,महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच २८ सप्टेंबर २०२२ रोजी शिवशक्ती चौक, गंगानगर रोड,साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजुला असलेल्या दुकानामध्ये गाळा नं.4 चे पडवी मधे मोकळ्या जागेत,फुरसुंगी हडपसर परिसरात बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमी नुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे,शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी छापा टाकला असता,काही व्यक्ती बेकायदेशीर कल्याण मटका जुगार व पणती पाकोळी सोरट जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे 10 व्यक्ती मिळुन आले.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण 95,810/- रू किंचा मुदेमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी नमुद 10 व्यक्तीांविरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं.1230/2022, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री.अमिताभ गुप्ता,मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री.संदिप कर्णिक, मा.पोलीस सह आयुक्त,पुणे शहर, श्री.रामनाथ पोकळे,मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,पुणेे, श्री.श्रीनिवास घाडगे,मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार तसेच सपोनि. अश्विनी पाटील, पोउपनि. श्रीधर खडके, पोलीस अंमलदार, राजेद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने संदिप कोळगे, हनमंत कांबळे, अमित जमदाडे व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.