अपघातात १२ जणांचा मृत्यू तर २३ जण गंभीर रित्या झालेत जखमी अपघाता नंतर आरटीओ अधिकारी हे पळून गेले : समृध्दी महामार्गावरील झालेल्या अपघातात १२ जणांच्या मृत्यूला आरटीओ मधील दोन अधिकाऱ्यांसह ट्रक चालक दोषी तिंघाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अपघात नंतर आरटीओ अधिकारी पळून गेले

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) समृद्धी महामार्गावर संभाजीनगर येथील सायगाव टोलनाक्यावर ट्रक व मिनी बसच्या काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला तर २३ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या अपघाताला दोन आरटीओ अधिकारी व ट्रक चालक दोषी असून या तिंघाच्या विरुद्ध आता वैजापूर पोलिस स्टेशन मध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलिस अधिकारी यांनी दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर ट्रक व मिनी बस यांच्यात मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे १२ प्रवासी यांच्या मृत्यूस दोन आरटीओ अधिकारी व ट्रक चालकच जखमी झाले आहेत.याबाबत पोलिस अधीक्षक यांनी स्वता रुग्णांलयात जाऊन जखमी प्रवाशांना कडून जबाब घेतला यावेळी जखमी प्रवाशांनी सांगितले की रात्रीच्या वेळेस जात असताना बारा वाजण्याच्या सुमारास आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाला ओव्हरटेक करून ट्रकच्या पुढे त्यांची जीप लावली व ट्रक चालकाला थांबायला सांगितले त्यावेळी ट्रक चालकांने अचानक पणे ब्रेक लावला व ट्रक थांबला व आमची मिनी बस ट्रकला जोरात धडकून सदरचा अपघात झाला.नंतर जखमी प्रवासी कमलेश म्हस्के यांनी रितसर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर व ट्रक चालका विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वैजापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल केला आहे.यात गुन्हे दाखल झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांचे नाव प्रदीप राठोड व नितनकुमार गणोरकर अशी नावे आहेत . यांना निलंबित करण्यात आले आहे. अपघाता नंतर हे घटनास्थळा वरुन पळून गेले होते.ते दोघे आरटीओ मध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.तर ट्रक चालकांचे नाव ब्रिजेशकुमार असे आहे.अशी माहिती पोलिस अधीक्षक मनिष कालवानिया यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.