देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप : मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू २३ जण गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक १५ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) समृद्धी महामार्गावर पून्हा एकदा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील सर्वजण देवदर्शन घेऊन परतत असताना १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर यात २३ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना घाटीतील रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.
अपघाताबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व भावीक हे नाशिक येथून खासगी ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथील बाबा सैलाणीच्या देव दर्शना करिता गेले होते.ते देवदर्शन करून परतत असताना समृद्धी महामार्गावर ( वैजापूर) अगरसायगाव परिसरात पुढे जाणाऱ्या ट्रकला रात्री साडेबाराच्या सुमारास साइडला घेतले त्याच वेळी पाठीमागून येणारी खासगी ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिल्याने अपघात झाला आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ दोन रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने घाटीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघात मध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे.जखमी २३ जणांनवर सध्या उपचार सुरू आहेत अपघातातील सर्वजण हे नाशिक येथील आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.