सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही : दादरच्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आगीत १६ ते १७ वाहने जळून खाक

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मध्यरात्री मुंबईत येथील दादर येथे मध्ये मुंबईत महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री एक वाजता अचानकपणे कोहिनूर इमारतीच्या महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर आग 🔥 लागली होती.आगची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांच्या १० ते १२ घटना स्थळी पोहचून सदरची आग आटोक्यात आणली आहे.या आगीत एकूण १६ ते १७ वाहने जळून खाक झाल्या आहेत आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आता कुलिंगचे काम सुरू आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की पार्किंगचा कंत्राटदार हे नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता यात मोठ्या प्रमाणावर क्षमतेपेक्षा जास्त वाहनं ही पार्किंग केली जाते.त्यामुळेच पार्किंगला आग लागली.दरम्यान या पार्कमध्ये एकूण १६ ते १७ वाहनं मात्र जळून खाक झाली आहेत.परंतू ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.