Burglars in pune : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून १८० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व दहा लाखाचा ऐवज जप्त

पुणे शहर परिसरात चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला क्राईम ब्रँच तीनच्या पथकाने अटक करून १८० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा ऐकून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदरच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. रेकॉर्डवरील गुन्हेगार शिकलगिरी व त्याचा साथीदार डुक्कर खिंडीतील वंडर फ्युचर या बिल्डिंग जवळ येणार असल्याची माहिती. पोलीसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. पोलिसांना बघून बाईक वरून शिकलगिरी हा पळून गेला. पोलिसांनी त्याचा साथीदार युवराज वसंत मोहिते ( वय ३४. रा.कडेगाव.जि.सांगली ) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ऐकून १८० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा एकूण १० लाख रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीवर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तीन गुन्हे. सिंहगड पोलीस ठाण्यात १ गुन्हा. अलंकार पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा.दत्तवाडी पोलीस ठाण्यात एक गुहा.खेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा. व पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा. असे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १० लाख ५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता.सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे.पोलीस उप आयुक्त गुन्हे शहर श्रीनिवास घाडगे.सहय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १. गजानन टोम्पे.यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे. पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील. पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार.पोलीस अंमलदार. संतोष शिरसागर राजेंद्र मारणे शरद वाकसे. रामदास गोणते. सुजित पवार. किरण पवार. ज्ञानेश्वर चित्ते प्रताप पडवळ.सतिश कत्रामे.राकेश टेकवडे.साईनाथ पाटील.गणेश शिंदे.प्रकाश कट्टे .दिपक क्षिरसागर.सोनम नेवसे. भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.