Crimes : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोहातंर्गत स्वातंत्रदिनी महाराष्ट्रातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

पुणे दिनांक १४ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त करावयाच्या समारोहाचा भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गातील कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकाषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्राल्या मार्फत निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र कारागृह विभागांचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ जालिंदर सुपेकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोहातंर्गत स्वातंत्रदिनी महाराष्ट्रातील कारागृहातून सुटका होणाऱ्या १८६ बंद्यांना " गुन्हेगारी जीवन सोडून देशांचे जबाबदार नागरिक बनण्याचे" आवाहन केले आहे.व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र मधील कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी या प्रमाणे आहेत.येरवडा कारागृह १६.येरवडा खुले कारागृह १.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ३४.ठाणे मध्यवर्ती कारागृह १.नागपूर मध्यवर्ती कारागृह २३.अमरावती खुले कारागृह ५.अमरावती मध्यवर्ती कारागृह १९.कोल्हापूर खुले कारागृह ५.कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ५.जालना जिल्हा कारागृह ३.पैठण खुले कारागृह २.औरंगाबाद खुले कारागृह २.औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह २४.सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह १३.मुंबई मध्यवर्ती कारागृह ७.तळोजा मध्यवर्ती कारागृह ८.अकोला जिल्हा कारागृह ६.भंडारा जिल्हा कारागृह १.चंद्रपूर जिल्हा कारागृह २.वर्धा जिल्हा कारागृह २.वर्धा खुले कारागृह १.वाशीम जिल्हा कारागृह १.मोर्शी खुले कारागृह १.गडचिरोली खुले कारागृह ४.असे एकूण १८६ बंदी आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.