Arrested : जळगाव येथे 12 लाखाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करुन 5 महिन्यांन पासुन फरार असलेले 2 गुन्हेगार जेरबंद

जुलै महिन्यात जळगाव येथिल भंगार व्यावसायीकाची 12 लाख रुपयाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करुन जळगाव मधुन पुण्यातील काशेवाडी भागातील अनु क्र 1. संतोष गुलाब खुडे अनु क्र 2. चंदु जाधव असे दोघेजण पळुन आले होते बाबत यांचेविरुध्द एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे जळगाव येथे गुन्हा नोंद क्रमांक- 614/2022 भादवि कलम 420,406,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्रातील दोन्ही आरोपी हे गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे 05 महिन्या पासुन फरार होते.
दि.18/11/2022 रोजी युनिट-1,गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट-1 च्या कार्यालयात हजर असताना जळगाव येथे दाखल गुन्हयाचे आरोपींचे शोधघेणे कामी एम.आय. डी.सी.पोलीस ठाणे जळगाव कडील पोलीस स्टाफ यांनी मदत मागितली असता मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले युनिट 1 गुन्हे शाखा पुणे यांनी आदेश दिल्याने फरार आरोपींची माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना आरेापी क्र 01. संतोष गुलाब खुडे हा आयकर भवन साधुवासवाणी रोड पुणे येथे असले बाबत माहीती मिळाल्याने सदर आरोपीस युनिट 1 कडील स्टाफ सह जावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले तसेच पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यास आरोपी क्र 02. चदु जाधव हा साधुवासवाणी चौक येथे येणार असल्याबाबतची माहीती मिळाल्यावरुन सदर पोलीस स्टाफसह जावुन आरोपी क्र 02 यास ताब्यात घेण्यता आले आहे. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे 1. संतोष गुलाब खुडे वय 44 रा काशेवाडी भवानी पेठ पुणे अनु क्र 2. चंद्रकांत शिवाजी जाधव वय 39 रा काशेवाडी भवानी पेठ पुणे अशी असल्याचे सांगीतले.त्याचेकडे जळगाव पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस वि·ाासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे जळगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री.अमोल झेंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-1, गुन्हे शाखा,पुणे शहर पेालीस निरीक्षक श्री.संदीप भोसले, सहा,पो.निरीक्षक आशिष कवठेकर,पोउप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात,अमोल पवार, इम्रान शेख,महेश बामगुडे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.