मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता मार्गावरील रेल्वे सेवा रद्द : बांगलादेशात दोन रेल्वेची समोरा समोर धडकल्या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू अनेकजण जखमी

पुणे दिनांक २३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बांगलादेशात रेल्वेचा भीषण अपघात झाला असून यात दोन रेल्वे ट्रेन समोरा समोर धडकल्याने या झालेल्या अपघातात एकूण २० रेल्वे प्रवासी यांचा मृत्यू झाला आहे.राजधानी ढाका जवळील कृष्णगंज जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे.या अपघाता मध्ये मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या अपघाता प्रकरणी सूत्रांकडून सांगण्यात आले की .रेल्वेचा समोरा समोर दोन ट्रेनची धडक झाली.यात रेल्वेच्या पटरी वरुन दोन्ही ट्रेन खाली उतरल्या आहेत.यात रेल्वे कोचच्या खाली अनेक रेल्वे प्रवासी अडकले आहेत.या अपघात मध्ये एकूण २० प्रवासी आतापर्यंत ठार झाले आहेत.तर अनेक जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.अपघात झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल व रेल्वे विभागांचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरू केले आहे.यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.या अपघाता नंतर रेल्वे सेवा विस्कळित झाली असून या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असल्यांने या मार्गावरील रेल्वे सेवा ही रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान या अपघाता मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.