FOSSIL : फॉसिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला 28,14,460 रुपयांचा गंडा

फॉसिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शोरूममधून महागड्या वस्तू आणि काउंटर मनीसह 28,14,460 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी स्टोअर मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान विमान नगर येथील फिनिक्स मॉलमध्ये घडली.
दापोडी येथील फ्रान्सिस जोसेफ डेव्हिड (३५) असे स्टोअर व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी एरिया मॅनेजर प्रथमेश अच्युत पैठणकर (वय 33, रा. नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नगर येथील फिनिक्स मॉलमध्ये कंपनीचे शोरूम आहे. ऑक्टोबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत शोरूमचे स्टोअर मॅनेजर डेव्हिड यांनी स्टोअरमधील कामगारांना तसेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिली.
कंपनीचा विश्वास संपादन करून डेव्हिडने घड्याळे, दागिने, बेल्ट, पाऊच अशा एकूण 8,73,049 रुपये किमतीच्या 147 वस्तूंचा गंडा घातला. तसेच, विक्री केलेल्या मालातील 19,41,411 रुपयांची रक्कम घेतली आणि ती जमा न करता आपल्या फायद्यासाठी वापरली.
अशाप्रकारे कंपनीची 28,14,460 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे कंपनीची 28,14,460 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.