मृतात ग्रामपंचायत सदस्य व पत्रकाराचा समावेश : पुलावरून सुसाट इन्वोव्हा कार पुलाच्या कठाडा तोडून धावत्या मालगाडीवर कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार २ गंभीररीत्या जखमी

पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) रायगड जिल्ह्यातील कर्जत किरवली रोडवरून भरघाव जाणाऱ्या इनो्वोव्हा कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रेल्वे पुलाचा कठडा तोडून खालून जाणाऱ्या रेल्वे मालगाडीवर कोसळून झालेल्या अपघातात कार मधील ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार व अन्य तिंघाजणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर अन्य दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की.इनोव्हा कार पहाटेच्या सुमारास भरघाव वेगाने जात असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ही रेल्वे पूलाचा कठाडा तोडून खालून जाणाऱ्या रेल्वे मालगाडीवर कोसळली पोलिसांनी कोसळलेली कार ही क्रेनच्या सह्हयाने काढून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यात मृत्यू झालेल्या तिघांचे नाव १)धर्मानंद गायकवाड ( वय ४० रा..नेरळ ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार) २) नितीन जाधव ( वय ३५ रा.मुंबई) ३) मंगेश जाधव ( वय ३० रा.मुंबई) अशी आहेत. तर जखमी झालेल्या दोघांजणाची नावे १) जयवंत हाबळे (वय ४४ रा.मुंबई पत्रकार) २) संतोष जाधव ( वय ३८ रा. मुंबई) असे आहेत.यांना उपचारा करीता कामोठे येथील एमजीएम रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.