आज सकाळी झालेल्या अपघातात : अहमदाबाद महामार्गावर ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर २ गंभीररीत्या जखमी

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी अहमदाबाद महामार्गावर कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.सदरचा अपघात हा वसई मधील सातिवली पुलावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई - अहमदाबाद महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुजरातकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने त्यांने महामार्गावरील दुभाजक तोडून गुजरात कडून येणाऱ्या भरघाव ट्रकला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.या झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचार करिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.