रेल्वे एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरून घसरले स्टेशन येण्यापूर्वीच अपघात : बिहार येथे रेल्वे एक्स्प्रेसला भीषण अपघात अपघातात ४ प्रवासी ठार तर २०० प्रवासी गंभीर जखमी

पुणे दिनांक १२ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बिहारच्या बक्सर जिल्ह्यात काल मध्यरात्रीच्या दरम्यान रेल्वे एक्स्प्रेसला भीषण असा अपघात झाला आहे.दरम्यान रेल्वेचे सर्वच डब्बे रुळावरून घसरले व भीषण असा अपघात झाला आहे.यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २०० हून अधिक प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमी प्रवाशांना तातडीने उपचारा करीता रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.व सर्वांनवर आता उपचार सुरू आहेत.
दरम्यान रेल्वे अपघाता बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीवरून कामाख्या जात असलेली नाॅर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बिहार मधील बक्कसर जिल्ह्यात अपघात झाला रुळावरून सर्वच डब्बे रुळावरून खाली घसरले.त्यामुळे भीषण अपघात झाला आहे.त्या मुळे भीषण असा अपघात झाला आहे.अपघाता नंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस.जीआरपी.आरपीएफ.व रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.सदरचा अपघात हा बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्टेशन जवळ झाला आहे.अपघात नंतर प्रवासी यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या रेल्वे ट्रेनची व्यावस्था रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान या रेल्वे अपघातांची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने टूविट केले आहे.की बचाव कार्य पुर्ण झाले आहे.व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अन्य रेल्वे ट्रेनची व्यावस्था करण्यात आली आहे.अशी माहिती रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी दिली आहे.या अपघातात अनेक रेल्वे प्रवासी रेल्वे डब्यात अडकले होते. पण स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य करुन त्यांना १० रुग्णवाहिका मधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेल्वेला नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास करत आहेत.रेल्वेच्या वतीने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. पटना करीता 9771449971 तर दानापूरसाठी 890569749 व आरासाठी 83061822542 हेल्पलाईन नंबर सुरू केले आहे.व कंट्रोल रुम करीता 7759070004 असा नंबर जारी करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.