आगीत ७ जणांचा मृत्यू तर ५८ जण जखमी : गोरेगावातील समर्थ सृष्टी इमारतीला लागलेल्या भीषण 🔥 आगीतील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत तर जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार मुख्यमंत्री

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील गोरेगाव येथील समर्थ सृष्टी या इमारतीला आज पहाटे तीन वाजता लागलेल्या भीषण आगीत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५८ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील मृत्यूच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तर जखमींचा रुग्णालयांचा खर्च राज्य सरकार करणार आहे. यातील पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.व मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान यात जखमी झालेल्यांना कूपर व ट्रामा केअर या दोन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी रुग्णांलयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे.सध्या अग्निशमन दलाच्या वतीने 🔥 आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.या आगीत ४० दुचाकी व ४ कार जळून खाक झाल्या आहेत.तर या आगीची झळ दुकानांना देखील बसली आहे.इमारतीच्या तळमजल्याला आग लागल्यानंतर खाली कपड्यांच्या व भंगाऱ्याच्या गोदामांमध्ये आग लागली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.