काल दुपारी झाले होते आंदोलन : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नवले पुलाजवळ जाळपोळ करण्याऱ्या आंदोलंकावर सिंहगड पोलिसांकडून ५००आंदोलंकावर गुन्हे दाखल

पुणे दिनांक १नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून याकरिता काल दुपारी मंगळवारी दुपारी पुणे ते बंगळुरू महामार्ग क्रमांक चारवर नवले पुलाजवळ आंदोलंकानी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला आठ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.दरम्यान याप्रकरणी हिंसक आंदोलन व जाळपोळ केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आज एकूण ५०० आंदोलंकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी आंदोलनकर्ते यांच्यावर मोठा जमाव गोळा करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३३६व ४४१ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलंकानी शांतता राखावी व साखळी उपोषण करावे असे आवाहन केले आहे.आंदोलंकानी कुठेही उद्रेक करु नये.असे जरांगे पाटील यांनी वारंवार आंदोलंकाना सांगितले आहे.पण आंदोलक हे राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणावर नाराजी झाले आहे.व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरले आहेत.व महामार्गावर टायर पेटवून आंदोलन करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.