Matka and gambling : शिवाजीनगर भागात मटका व जुगार अड्ड्यावर छापा मारून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सामाजिक सुरक्षा विभाग पुणे शाखा पुणे शहर यांनी शिवाजीनगर भागातील मोकळ्या जागेत जुगार व मटका त्यावर छापा मारून मटका खेळणाऱ्या एकूण १० व्यक्ती व फरार असणाऱ्या एका व्यक्तींवर कारवाई केली आहे.व सदरच्या कारवाईत ५० हजार ८४० रुपये व अन्य साहित्य जप्त केले आहे.
शिवाजीनगर भागात मोकळ्या मैदानात बेकायदेशीर रित्या मटका व जुगार काहीजण खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाल्यानंतर सदरच्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून मटका व जुगार खेळणाऱ्या एकूण १० व्यक्ती व गुन्ह्यात फरार असलेल्या एका व्यक्तीवर कारवाई केली आहे व या सर्व जणांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १७८/ २०२२. महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. व त्यांच्याकडून रोख रक्कम मटका व जुगार खेळण्याची साहित्य असा एकूण ५० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा एक पुणे शहर यांनी दिली आहे. सदर गुन्ह्याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत बाबा कर्पे. अजय राणे मनीषा पुकाळे अण्णा माने प्रमोद मोहिते इरफान पठाण हनुमंत कांबळे संदीप कोळगे व पुष्णेद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.