MD seized at kondhwa : कोंढवा येथे छापा टाकुन 52 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ-5 मधील वानवडी पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक 21/10/2022 रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एक इसम कोंढवा पुणे येथील आयसुट हॉटेल समोर,उंन्ड्री,पिसोळी येथे अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे.
मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक-2,कडील अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता,आयसुट हॉटेल समोर,उंन्ड्री पिसोळी,कोंढवा येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक इसम एका लाल व काळया रंगाचे कार क्र.एमएच/12/जीएफ/9948 हिचेमध्ये बसलेला दिसला,त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता,त्याने त्याचे नाव अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी,वय 32,रा.दस्तगीर मंजील गल्ली नं.3,शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 1,40,000/- रु किचा 52 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ 10,000/- रु.किचा मोबाईल संच व 7,50,000/- किची व्होक्स वॅगन पोलो कंपनीची कार असा एकुण 18,00,000/- ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेंशन गु.र.नं.1056/2022,एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क),22(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-2,श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-2,गुन्हे शाखा,पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक,सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक,दिगंबर चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक, एस.डी.नरके, पोलीस अंमलदार,संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, अप्पा रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, योगेश मांढरे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.