Crimes : पुणे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्तांच्या घरी सापडले ६ कोटीचे घबाड " यालाच म्हणतात महसूल आणी पैसेच पैसे वसूल "

पुणे.दिनांक ९ ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)महसूल विभागीय आयुक्त कार्यालयात सी बी आय ने छापे टाकले या अधिकाऱ्यांच्या घरात सहा कोटी रुपयांची रोकड सापडली. या महसूल विभागीय अधिकाऱ्यांचे नाव अनिल रामोड असे आहे.सी बी आय ने त्याना शेतकऱ्यांकडून ८ लाख रूपायांची रोकड घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. महामार्ग वरील जमीन बाबत हा सापळा होता.व सी बी आय ने या संदर्भात सापळा रचला होता.
रामोड यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे सातारा व सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरण रामोड हे पाहत होते.खेड्यातील शेतकरी व त्याच्या जमीनीला जास्त मोबदला मागत आहे.व तक्रार दार अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालय समोर तसेच सातारा. सोलापूर पुणे जिल्ह्य़ा साठी राष्ट्रीय महामार्ग लवाद नुसार यांच्या कङे अधिकचा मोबदला मिळावा म्हणून त्याची प्रकरण मांडीत होते.रामोड यांनीच शेतकऱ्यांची प्रकरण प्रलंबित ठेवले होते.या साठी शेतकऱ्यांनी त्याच्या बरोबर संवाद साधला असता. तेव्हा त्यांनी वाढीव मोबदल्यात रक्कमेचा दहा टक्के रक्कम मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडे केली होती
आरोपींने ५०हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितल्यचा आरोप देखील आहे.सुमारे सवा कोटीरूपये वाढीव भरपाई साठी तक्रारदाराकङून १० लाख रुपये मागण्यात आले होते.शेवटी तडजोड अंती या लाचेची रक्कम ८ लाख रूपये झाली होती.सी बी आय ने सापळा रचून शेतकऱ्यांकडून आठ लाख रूपायांची लाच घेतानाच त्याना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर पुण्यातील तीन ठिकाणी आरोपीच्या अधिकृत व निवासी जागेची झडती घेण्यात आली. त्या मध्ये सहा कोटी. स्वताच्या व कुटुंबाच्य नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तेशी संबंधित कागद पत्रे व गुंतवणूक बॅक खाते तपशिल सर्व जप्त करण्यात आला आहे.रामोड यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.