6 Lakh's fraud by selling same car : एकच कार दोन जणांना विकून सहा लाखांची फसवणूक

एकच कार दोन जणांना विकून एका ग्राहकाची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एकच वस्तू दोन जणांना विकण्याची शक्कल या व्यक्तीने लढवली. ही घटना खेडजवळील रासे गावात 22 जुलै ते 9 जानेवारी दरम्यान घडली.
याप्रकरणी गणेश अबू मंगसे (वय 45, रा. राजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सनी सुनील दाते (वय 33, रा. पाषाण) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत मारुती सुझुकी ब्रेझा व्हीडीआय कार खरेदी केली. त्यानुसार फिर्यादीने आरोपींना 6.20 लाख रुपये दिले व गाडी ताब्यात घेतली. मात्र आरोपीने ही कार दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले.
आपली फसवणूक झाल्याचे मंगसे यांच्या लक्षात येताच त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.